बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंगळुरुच्या ‘या’ खेळाडूनं मोडली मुंबईची कंबर, निम्मी टीम पाठवली माघारी!

चेन्नई | आजपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 14 वा हंगाम सुरू झाला आहे. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामी लढत रंगात आली आहे. या सामन्यात मुंबईने बंगळुरू समोर 160 धावांचं लक्ष्यं ठेेवलं आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात नुकताच प्रवेश केलेल्या हर्षल पटेलने भेदक गोलंदाजी करत 5 गडी तंबूत परतवले.

मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलला या वर्षीच्या ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतलं. हर्षलने पहिल्याच सामन्यात मुंबईचे 5 गडी बाद केले. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या इशान किशनला हर्षलने पायचित केलं आणि बंगळुरूला  सामन्यात परत आणलं. त्यानंतर लगेच मुंबई संघाचे मजबूत स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्डला हर्षलने बाद केलं.

20 वं षटक टाकण्यासाठी विराटने हर्षलकडे चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूत त्याने कृणालला बाद केलं.त्यानंतर कायरन पोलार्डला देखील पुढच्याच चेंडूत झेलबाद केलं. 20व्या शटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षल हॅट्रिकवर होता. यॉर्कर टाकलेल्या या चेंडूवर त्याला विकेट मिळवता आली नाही. पण पुढच्याच चेंडूत त्याने मार्को जन्सेनचा त्रिफळा उडवला.

दरम्यान, मुंबईने 160 धावांचं लक्ष्य बंगळुरू समोर ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बंगळुरूच्या 45 धावांच्या बदल्यात 1 गडी बाद झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं अन् रडणं बाईसारखं- गोपिचंद पडळकर

एवढी कुठं ताकद असते का राव?, ‘या’ खेळाडूनं शॉट मारताच बॅटचे दोन तुकडे, पाहा व्हिडीओ

वीकेंड लाॅकडाऊनच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी धक्कादायक

रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सची भन्नाट आयडिया, वाचा सविस्तर

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More