बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अहो संजय राऊत… निर्लज्जपणालाही काही मर्यादा असतात”

मुंबई |  संसदेत मंगळवार 20 जुलै रोजी केंद्र सरकारकडून ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नसल्याची अकडेवारी सादर करण्यात आली. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारच्या या दाव्यानंतर आम्हाला धक्का बसला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अशातच संजय राऊतांच्या वक्तव्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अहो संजय राऊत निर्लजपणालाही मर्यादा असतात. केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा, असं म्हणत भातखळकरांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात अतुल भातखकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.

“ठाकरे सरकारने मे महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं होतं की, महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्यांनी दिलेल्या अहवालानेच बनतात. त्यामुळे केंद्राने ठाकरे सरकारने जो अहवाल केंद्राला दिला. त्यानूसार अहवाल बनवला आहे. वर संजय राऊत म्हणतायत केंद्राच्या अहवालाने आम्हाला धक्का बसला.”

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारचा अहवाल पाहून संजय राऊतांना धक्का बसला आहे. कदाचित संजय राऊतांना पूर्ण माहिती नाही. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे पण, खोट्या बातमीवर तुम्ही राजकारण करत असाल, तर त्याचा आम्हालाच धक्का बसला असल्याचं पात्रा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

एसटीचं कौतुकास्पद पाऊल, आता महिला बस चालवताना दिसणार!

“भारतात कोरोनामुळे 4 लाख नव्हे तर 50 लाख मृत्यू”, या दाव्यानं मोठी खळबळ

सोन्या चांदीचे दर पुन्हा उतरले; वाचा आजचे ताजे दर

…त्या लोकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा- संजय राऊत

गुरुवारपासून ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना सुरु; ‘या’ लोकांना मिळणार लाभ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More