बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अहो, हे खरं असुच शकत नाही’; मीराबाई चानुच्या ‘त्या’ फोटोवर आर.माधवन म्हणतो…

नवी दिल्ली | ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला सुवर्ण पदक मिळवुन देत मीराबाई चानु यांनी चांगलंच नावलौकीक मिळवलं. मीराबाई चानु यांचं संपुर्ण देशभरातुन कौैतुक होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच याच पार्श्वभुमीवर मीराबाई चानु यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, मीराबाई चानु यांच्या घरातील काही सदस्यांसोबत जेवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये मीराबाई यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावर आता सिनेअभिनेता आर. माधवन याने ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एका व्यक्तीने मीराबाई चानु यांचा घरात जेवण करत असतानाचा फोटो टाकत त्यावर आर. माधवन याने ट्विटरवर मीराबाई चानु यांचा तो व्हायरल होत असलेला फोटो रिट्विट करत, ‘मीराबाई चानु या त्यांच्या मणिपूर येथिल सर्वसामान्य घरी, प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या महिलेला सोयीसुविधांचा अभाव आणि गरिबी स्वप्ने साध्य करण्यापासून रोखू शकत नाही’, असं लिहिलं आहे.

या ट्विटला रिट्विट करत आर. माधवन याने हे खरं असुच शकत नाही, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर हे पाहुन माझ्याकडे शब्द नसल्याचंही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व गोष्टींमुळे आता नेटकरी यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

बाबो! हाॅकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यास ‘हे’ सरकार प्रत्येक खेळाडुला देणार एवढे कोटी रूपये

रिलायन्स जियोने आणला सर्वात स्वस्त धमाकेदार प्लान; वाचा सविस्तर

“मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाय अन् आता परत आलाय”

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूलीबाबत उर्जामंत्र्यांचे ‘हे’ आदेश

पतीच्या बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् घडला अनपेक्षित प्रकार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More