बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्युट! पोलिसांनी जखमी महिलेला 4 किलोमीटर झोळीमध्ये उचलून नेत वाचवले प्राण

पुणे | कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे. तर दुसरीकडे काही लोक माणुसकी जिवंत असल्याची अनुभती देत आहेत. माणुसकीचं दर्शन घडविताना लोहमार्ग पोलिसांनी जांबरूंग रेल्वे ट्रॅक जवळ जखमी अवस्थेत पडलेल्या एका महिलेला तब्बल 4 किलोमीटर अंतरापर्यत झोळीमध्ये उचलून नेत तिचे प्राण वाचविले. पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होते आहे.

पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधिक्षक सदानंद वायसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास आशा वाघमारे ह्या जांबरुग गावाजवळ रेल्वे पटरी ओलांडत होत्या. त्यावेळी कोणत्यातरी धावत्या रेल्वेगाडीची धडक लागून त्या खाली पडल्या. त्यामध्ये त्यांच्या मनक्‍याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. लोणावळा स्टेशन मास्तर यांना याची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत लोणावळा दुरक्षेत्र लोहमार्गाला याची माहिती दिली.

त्यानुसार पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक गोसावी व त्यांच्या पथकाला तत्काळ जखमी आशा वाघमारे यांना मदत करण्यास सांगितलं होतं. महिला पडेलेला भाग दुर्गम असल्यामुळं रुग्णवाहिका तिथं पोहचू शकत नव्हती. शेवटी पोलिसांनी कपड्यांची झोळी करून महिलेला त्यामध्ये टाकलं. त्यानंतर घटनास्थळापासून तब्बल चार किलोमीटर पायी चालत पळसदरी रेल्वेस्टेशन गाठले. तिथं रुग्णवाहिकेत महिलेला टाकून कर्जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं.

दरम्यान, सदर जखमी आशा वाघमारेच्या मणक्याला मार लागल्यानं पुढील उपचारासाठी तत्काळ पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. औषधोपचारानंतर ही महिला आता बरी झाली आहें.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

सकारात्मक बातमी! जन्मताच आईचं छत्र हरपलेल्या नवजात बालकाने 19 दिवसात केली कोरोनावर मात

“मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शरद असं पवारांना कधीच वाटलं नाही”

कोरोनाने 6 वर्षीय मुलगा दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरवर केला जीवघेणा हल्ला

‘पंतप्रधान मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न होता’; राज्यातील ‘या’ पक्षाच्या पक्षप्रमुखांचा खळबळजनक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More