स्मार्टफोनमध्ये लपलंय भन्नाट सिक्रेट फीचर; डिलीट झालेल्या कॉलची हिस्ट्रीही मिळेल!

Hidden Smartphone Feature  Recover Deleted Call History Easily 

Smartphone | आजकाल स्मार्टफोन (Smartphone) आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. केवळ कॉलिंगसाठीच नाही, तर दैनंदिन कामांसाठीही स्मार्टफोनचा वापर होतो – जसे की कामाचे मेसेज पाठवणे, अलार्म लावणे, पैसे ट्रान्सफर करणे, शॉपिंग आणि माहिती मिळवणे. स्मार्टफोनमध्ये  अनेक उपयुक्त फीचर्स आहेत, पण त्यापैकी बरीचशी आपल्याला माहीत नसतात.

स्मार्टफोनची उपयुक्त वैशिष्ट्ये

कॅमेरा आणि स्टोरेजव्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये (Smartphone) अनेक छुपी वैशिष्ट्ये आहेत जी आपले जीवन सोपे करू शकतात. उदाहरणार्थ, कोणाला लाइव्ह लोकेशन (Live Location) पाठवणे, व्हॉट्सॲपसारख्या (Whatsapp) ॲप्सद्वारे तुम्ही हे सहज करू शकता.

स्मार्टफोनच्या (Smartphone) डायलर पॅडमध्ये (Dialer Pad) एक खास फीचर लपलेले आहे, ज्याद्वारे तुम्ही डिलीट झालेला कॉल हिस्ट्री (Call History) सहजपणे काढू शकता. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची (Third-party App) गरज नाही.

कॉल हिस्ट्री काढण्याची पद्धत

तुमच्या स्मार्टफोनमधील (Smartphone) डायलर ॲप (Dialer App) उघडा. ‘Recent’ किंवा ‘Call History’ पर्याय निवडा. येथे तुम्हाला तुमच्या सर्व कॉल्सची यादी दिसेल. जर तुम्हाला एखादा नंबर दिसत नसेल, तर तुमच्या सिमकार्ड कंपनीच्या (Service Provider) ॲपवर जा. तिथे तुम्हाला कॉल हिस्ट्री (Call History) नक्की मिळेल. कारण फोनमधून नंबर डिलीट (Delete) केला तरी, तो सर्विस प्रोवायडरच्या (Service Provider) ॲपवरून डिलीट (Delete) करता येत नाही.

MyJio ॲपवर (App) जा. लॉग इन (Log in) नसल्यास, फोन नंबर टाकून लॉग इन (Log in) करा. वर उजव्या कोपऱ्यातील आयकॉनवर (Icon) क्लिक करा. एक लिस्ट उघडेल, त्यात ‘My Usage’ पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला कॉल, मेसेज आणि इंटरनेट असे तीन पर्याय दिसतील. ‘कॉल’ पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला फोन हिस्ट्रीमधून (Call History) डिलीट (Delete) झालेले नंबर मिळतील.

Title : Hidden Smartphone Feature  Recover Deleted Call History Easily 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .