Top News मनोरंजन

आता ‘या’ मुलानं लावली सोशल मीडियावर आग, लोक परत परत पाहात आहेत व्हिडीओ!

मुंबई | सोशल मीडियावर कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. आजकाल एका दिवसात इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या टॅलेंटेड लोकांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून असाच एक मुलगा आपल्या आवाजानं इंटरनेटवर आग लावत आहे.

व्हिडीओतील मुलगा अत्यंत स्टाईलबाजपणे असल्याचं दिसतं. गाणं गात असताना त्याने दाखवलेला स्टाईलबाजपणा भावल्याशिवाय राहात नाही. या व्हिडीओत त्यानं गायक अरजीत सिंगनं गायलेलं तुझे कितना चाहने लगे हम है हे गाणं गायलं आहे. या मुलाच्या आवाजात तर जादू आहेच, शिवाय त्याचा अभिनयही कमाल असल्याचं दिसतंय. गाणं म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव खरोखऱ पाहण्यासारखे आहेत.

कुठल्यातरी ग्रामीण भागात सहज कुठल्यातरी साध्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडीओ आता बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकदा बघायला घेतलेला मनुष्य हा व्हिडीओ मध्यावर सोडत नाही किंवा पुन्हा पुन्हा पाहात राहतो.

अनेकांमध्ये काही कलागुण असतात, मात्र त्यांना योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ते समोर येत नाहीत. सोशल मीडियामुळे अशा गुणी लोकांना एक मंच तयार झाला आहे. काही खास असेल तर इंटरनेटवर ते व्हायरल झाल्याशिवाय राहात नाही. या मुलाकडेही प्रतिभा आहे, त्यामुळे इंटरनेटवर त्याला एवढं पाहिलं जातंय.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाचे काम वर्षभरात संपवा; नितीन गडकरींचे सक्त आदेश

…नाहीतर काम उखडून फेकीन; पुण्यात नितीन गडकरींची कंत्राटदाराला तंबी!

व्हॉट्सअप ग्रुपद्वारे ओळख, मग महिलेकडून पैसे घेतले, नंतर पैसे देण्याच्या बहाण्याने…

पूजा चव्हाण प्रकरणात आम्हाला येत आहेत ‘या’ अडचणी- पोलीस

कोरोनामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या