Top News महाराष्ट्र मुंबई

“माहिती लपविणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर एका महिलेनं बलात्कार केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. यातच भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. दुसरं माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात निलेश राणेंनी ट्विट केलं आहे.

हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी त्यांच मंत्रिपद सोडावं. तसंच त्यांची आमदारकी देखील रद्द करावी, अशी मागणी भाजपकडून निवडणूक आयोगाकडं करण्यात आली आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकी सुरु झाली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नेमका काय निर्णय घेतात यावर मुंडेंचे राजकारण अवलंबून असणार आहे.


थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडे प्रकरणावर राष्ट्रवादीचीही ‘तीच’ भूमिका-अजित पवार

शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्यानं ते परत घेणं सरकारची जबाबदारी- भुपेश बघेल

“धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नसून ते वैयक्तिक”

मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू- शरद पवार

धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या