बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झिका व्हायरसची वाढती रुग्णसंख्या पाहता ‘या’ राज्यात हायअलर्ट जारी!

तिरुवनन्तपुरम | केरळमध्ये कोरोना विषाणू संक्रमण अद्यापही चिंताजनक स्थितीमध्ये असतानाच केरळमध्ये आणखी एका विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केरळमध्ये झिका या नवीन विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. डेंग्यूच्या एडिस इजिप्तीसारख्या डासामुळे हा रोग होतो.

तिरुअनन्तपुरम येथे एका 24 वर्षीय गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. शनिवारपर्यंत या रोगाच्या रुग्णांची संख्या 15 वर जाऊन पोहोचली.

आमचा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोविडमध्ये आमची रुग्णसंख्या कमी आहे. केरळात प्राणवायूअभावी कुणी मरण पावलेले नाही. झिका विषाणूविरोधात केरळने कृती योजना तयार केली आहे. त्यामुळे झिकाचा प्रसार होणार नाही. शुक्रवारी केंद्राने तज्ज्ञांचे पथक तेथे पाठवले होते. राज्य सरकारच्या मदतीसाठी काही सामुग्रीही पाठवली होती, असं आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं.

दरम्यान, केरळमध्ये झिका व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

थोडक्यात बातम्या – 

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट, पण मृतांचा आकडा वाढला 

“चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी, आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही”

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी भाष्य करणार नाही – शरद पवार

कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच अवघ्या 9 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

“हक्काचं असताना दिलं जात नसेल, तर मी माझ्या कर्मानं इथला पालकमंत्री बनेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More