बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परतीच्या पावसामुळे ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट; पुढचे 4 दिवस धोक्याचे

मुंबई | पुण्यातील अनेक भागामध्ये काल झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सखल भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील विविध भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राजस्थानमधून हा पाऊस परतीचा प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागामध्ये वरूणराजा बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवा़ड्यात काही दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यातच आता रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक,अहमदनगर, बीड, सातारा, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदीया, भंडारा, गडचिरोली, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना हवामान विभागातर्फे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा,विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 4 दिवस राज्यासाठी धोक्याचे असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येतंय.

काल पुण्यात अवघ्या 2 तासात 26.3 मीमी पावसाची नोंद करण्यात आली. याबाबत पुणे वेधशाळेने माहिती दिली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सोमवारी संध्याकाळी पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. तसेच अनेक भागामध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली.

थोडक्यात बातम्या – 

हाॅर्नची कटकट संपणार, नितीन गडकरींनी आणली ‘ही’ नवी योजना

”फक्त भाजप आमदारांच्या मतदारसंघातच लाॅकडाऊन लावलं जातं”

“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र…” राऊतांचा मीडियावर हल्लाबोल

3 बैठकीतही वाद मिटला नाही मग सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं अन्…; गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

“आगामी काळात शिवसेना बॅक टू पव्हेलियन होऊ शकते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More