हात-पाय दुखताहेत? पायात मुंग्या येताहेत?, तुम्हाला या आजाराची लागण तर झाली नाही ना?

High Cholesterol Symptoms | सतत हात-पाय दुखणे आणि पायात मुंग्या येणे या समस्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. ही लक्षणे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते. सध्याच्या धावपळीच्या युगात, अंबाजोगाई (Ambajogai) परिसरातील नागरिकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाण चिंताजनक असून, या समस्येचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. (High Cholesterol Symptoms )

आजकाल जीवनशैलीतील बदलांमुळे बहुतांश लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि शुगर (Sugar) या आजारांप्रमाणेच कोलेस्ट्रॉल वाढणेदेखील आता सामान्य बाब झाली आहे. परंतु, वेळेवर योग्य ती काळजी न घेतल्यास, कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकारासह (Heart Disease) अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि शरीरात त्याचे कार्य काय?

कोलेस्ट्रॉल हा एक मेणचट पदार्थ (Waxy Substance) असून, तो शरीरात हार्मोन्स (Hormones), व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) आणि पित्त (Bile) तयार करण्यास मदत करतो. हाडे मजबूत ठेवण्यासाठी शरीरात कॅल्शिअम (Calcium) शोषून घेण्यासही कोलेस्ट्रॉलची भूमिका महत्त्वाची असते.

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखणे अत्यंत गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी 120 mg/dL पेक्षा कमी नसावी आणि 120 ते 160 mg/dL पातळी सामान्य समजली जाते. अयोग्य कोलेस्ट्रॉल, म्हणजेच एलडीएल (LDL) ची पातळी 80 ते 90 mg/dL या दरम्यान असावी. (High Cholesterol Symptoms )

कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे कोणती?

हात-पाय दुखणे
पायात मुंग्या येणे
मळमळ
शरीर सुन्न पडणे
थकवा जाणवणे
छातीत दुखणे
श्वास घेण्यास त्रास होणे
हात-पाय थंड पडणे

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे धोके कोणते?

कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke), मज्जातंतूशी संबंधित आजार (Nerve Related Diseases) यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कोलेस्ट्रॉल हा शरीरात आढळणारा एक प्रकारचा फॅट (Fat) आहे, जो अनेक हार्मोन्स बनवण्यासाठी मदत करतो. जर कोलेस्ट्रॉलची शरीरातील मात्रा योग्य प्रमाणात नसेल तर त्याचे परिणाम आरोग्यावर होऊ शकतात.

कोलेस्ट्रॉल कसे नियंत्रणात ठेवाल?

नियमित व्यायाम (Regular Exercise) करणे आवश्यक
आहारात फळे (Fruits), भाज्या (Vegetables) आणि संपूर्ण धान्ययुक्त (Whole Grains) पदार्थांचा समावेश करावा
तेलकट पदार्थ आणि जंकफूडचे (Junk Food) सेवन टाळावे
शारीरिक हालचाली वाढवाव्यात
नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने कोलेस्ट्रॉलची तपासणी करावी
“हृदयाचे आरोग्य सांभाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल वेळोवेळी तपासून त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी खानपानावर नियंत्रण, नियमित व्यायाम आणि पुरेशा प्रमाणात शारीरिक हालचाली करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील,” असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी (Expert Doctors) दिला आहे. (High Cholesterol Symptoms )

Title : High Cholesterol Symptoms Precautions Heart Health