Top News

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या; विखे, क्षीरसागर, महातेकरांचं मंत्रीपद सुरक्षित!

मुंबई | राज्यमंत्री मंडळाच्या विस्ताराला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. 

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी योजना हमी राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांना दिलासा मिळाला आहे. 

निवडणुकीच्या तोंडावर सध्या पक्षांतराचा ट्रेंड सुरू आहे. आजचे मतदार सुजाण आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी समजतात. येत्या निवडणुकीत मतदारच या नेत्यांबाबतचा फैसला करतील, अशा शब्दात न्यायालयाने दाखल झालेल्या याचिकांवर आपला निर्णय सुनावला आहे. 

विरोधी पक्षातल्या नेत्यांचं आपल्या पक्षाशी असलेलं इमान सोडून आपल्या पक्षाला सोडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचं समर्थन करताच येणार नाही मात्र कायद्याने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करता येणार नाही, असं मत न्यायमुर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमुर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या