Top News महाराष्ट्र मुंबई

स्थायी समितीची सभा घेण्यास हायकोर्टाची परवानगी!

मुंबई | सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत स्थायी समितीची सभा घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पालिकेला दिली आहे.

कोरोनाचे नियम लक्षात घेता या बैठकीत केवळ 26 सदस्य आणि 12 कर्मचाऱ्यांनाच सहभागी होता येणार आहे. तब्बल सात महिन्यानंतर स्थायी समितीची सभा होणार असल्याने रखडलेली मुंबईतील विकासकामे पालिकेच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत एका दिवसात 674 प्रस्ताव संमत करण्यात येणार असल्याचा दावा करत भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि प्रभाकर शिंदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

संघात बदल करण्याची हीच योग्य वेळ- महेंद्रसिंग धोनी

नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून दारूडे आहेत- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंचे संकेत? मोदींविरोधातील ट्विट केलं रिट्विट

प्रचार सभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकल्या चपला, व्हिडीयो व्हायरल

दिलासादायक! देशात तीन महिन्यांनंतर आढळले 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या