महाराष्ट्र मुंबई

‘तुम्ही कठीण काळातही भन्नाट काम केलं’; मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून कौतुक

मुंबई | कोरोना काळात मुंबई पोलिसांनी केलेल्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक केलं आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठाने मुंबई पोलिसांनी कठीण काळात भन्नाट काम केल्याचं म्हटलंय.

मुंबई पोलिसांची जगभरात वाहवा होत असून मुंबई पोलीस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जातात, असं मत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एम. एस. कर्निक यांच्या खंडपीठाने नोंदवलंय.

मुंबई पोलीस आधीच खूप तणावात आहेत. त्यांना 12-12 तास ड्युटी करावी लागते. त्यानंतर येथे मिरवणूक, मोर्चे यांचा बंदोबस्त देखील असतो. अशा विपरीत परिस्थितीत मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट पोलिसांपैकी एक मानले जाते. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांकडूनही त्यांना सहकार्य अपेक्षित आहे, असं न्यायमूर्ती एस. एस. शिंदे म्हणाले.

कोरोना संसर्गाचा धोका असतानाही मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण…- अशोक चव्हाण

विजय वडेट्टीवारांच्या त्या भूमिकेला भाजपचं समर्थन!

महिलेने मारहाण केल्यानंतरही संयमाने परिस्थिती हाताळणाऱ्या एकनाथ पार्टेंचा गृहमंत्र्यांकडून सत्कार!

“भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या