बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस; ‘या’ प्रकरणामुळे रहावं लागणार हजर

मुंबई | बाॅलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानला पुन्हा न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान आणि कमाल आर खान यांच्यात वाद रंगलेला दिसत आहे. सलमानच्या राधे या चित्रपटानंतर कमाल खानने सलमानची खिल्ली उडवत वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे.

कमालच्या वादग्रस्त पोस्टवर आक्षेप घेत सलमानने दिवाणी सत्र न्यायालयात कमाल खान विरुद्ध याचिका दाखल केली होती. कमालच्या पोस्टमुळे चित्रपटांना निगेटिव्ह रिव्हीव मिळाला. त्यामुळे कमालला कोणतीही पोस्ट लिहिण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी सलमानने केली होती.

सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान दिवाणी सत्र न्यायालयाने सलमानच्या बाजूने निकाल दिला. त्यावर आता कमाल खानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयात या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने सलमानला नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाचं हजर राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. दोन आठवड्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

यंदा पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, मुरलीधर मोहोळ यांनी केली मोठी घोषणा!

राज्यात साथीच्या रोगांचा कहर! ‘या’ जिल्ह्यात आढळले तब्बल 1300 रूग्ण

”या’ तारखेपर्यंत मनसेच्या कार्यालयात आला नाहीस तर….’; मनसेचा साहिल खानला अल्टिमेटम!

टी-20 मध्ये कर्णधार रोहित शर्मा असेल पण ‘हे’ दोन खेळाडूही आहेत रेसमध्ये!

गुजरातमध्ये संपुर्ण मंत्रिमंडळच बदललं, विजय रूपाणींच्या सगळ्याच मंत्र्यांना नारळ 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More