महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.

येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाचा आजचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

कांजूर कारशेड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. तसेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होतं. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला.

थोडक्यात बातम्या-

“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”

नवरीसारखा श्रृंगार करत आपल्या पोटच्या मुलांसोबत महिलेने केलं धक्कादायक कृत्य!

“राज्यातील दोन दिवसाचं अधिवेशन आठवं आश्चर्य तर केंद्राने रद्द केलेलं अधिवेशन हे कितवं आश्चर्य”

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘मी हाडाचा शेतकरी आहे’; वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करणाऱ्या दानवेंवर कडूंनी साधला निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या