औरंगाबाद महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्दच ठेवण्यात आलंय. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला.

छिंदमने ठाकरे सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. पण सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने छिंदमला मोठा दणका दिला.

अहमदनगर महापालिका आणि राज्य सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द केलं होतं. शासन निर्णयाच्या विरोधात छिंदमने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर आणि भाजपच्या तिकीटावर त्यावेळी नगरसेवकपदी निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते.

थोडक्यात बातम्या-

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटतं”

ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल भवनाबाहेर राडा, गोळीबारात महिलेचा मृत्यू

‘…तर कायमस्वरुपी बंदी आणू’; ट्विटरचा ट्रम्प यांना इशारा

“टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या