महाराष्ट्र मुंबई

‘कंगणाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने’; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं

मुंबई | मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगणा राणावतच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. कंगणा राणावतविरोधात महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

महापालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर त्याविरोधात कंगणाने उच्च न्यालालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. कंगणाचं पाडकाम हायकोर्टाने अवैध ठरवलं असून बीएमसीला यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

कंगणाची वास्तू नवी नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर आहे. महापालिकेने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

हायकोर्टाने निरीक्षकाची नियुक्ती केली असून ते कंगणाच्या ऑफिसच्या पाडकामामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

स्मिथ आणि फिंचची दमदार शतकं; ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 375 धावांचं खडतर आव्हान

प्रताप सरनाईक प्रकरणासंदर्भात ईडीने केला मोठा खुलासा

राज्यातील सध्याचे सरकार लवकरच कोसळेल कारण…-राम शिंदे

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार- अनिल देशमुख

राज ठाकरे, फडणवीसांनी वीजबिले भरली, पण जनतेला सांगता वीजबिले भरु नका- नितीन राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या