बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निकाल!

शिमला | आजही भारतात अंतरजातीय विवाह करण्यास नकार दिला जातो. विरोध केल्यानंतर देखील जरी जोडप्याने लग्न केलं तर नंतर त्यांचा छळ केला जातो. काही प्रकरणांमध्ये हा छळ जीवेमारण्यापर्यंत जातो. मात्र आता हिमाचल प्रदेश हायकोर्टानं यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

एका आंतरजातीय विवाहाची याचिका कोर्टात आली होती. या याचिकाचा निर्णय जस्टीस विवेक सिंग ठाकूर यांच्या खंडपीठानं दिला. मात्र या सुनावणीदरम्यान आपण संविधान चालवणाऱ्या राज्यात राहत असून जातीचा निकष लावून कोणाच्या जोडीदार निवडणाच्या हक्कावर बाधा आणणं हे गैर आहे, असं कोर्टानं सांगितलं.

हायकोर्टकडे आलेली याचिका ही राजपूत महिला कोमल परमारला खालच्या जातीच्या संजीव कुमारसोबत विवाह करण्या संदर्भात होती. ही याचिका संजीव कुमारने केली असून, कोमल परमारला तिच्या कुटुंबियांनी तिचा त्याच्यासोबत विवाह रोखण्यासाठी तिच्या ईच्छेविरुद्ध ताब्यात घेतलं होतं.

कोमलला कोर्टासमोर हजर केल्यानंतर तिचं अपहरण केलेल्या आरोपाला तिने दुजोरा देऊन कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी तिचा छळ केल्याचं सांगितलं. मात्र सध्या तरी कोमलची आपल्या पालकांसोबत राहण्याची इच्छा नसून त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे त्यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करायची इच्छा नसल्याचं कोमलने कोर्टात सांगितलं.

भारतात स्त्रीचं स्थान कायमच एक स्वतंत्र आणि समान हक्क असलेली व्यक्ती असं राहिलेलं आहे. स्त्री म्हणजे काय कुठलं मुकं जनावर नाही. भारतीय संविधानानं आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा हक्क हा कायमच महत्त्वाचा हक्क मानलेला आहे. या प्रकरणातही कोमल ही सज्ञान आहे. ती तिच्या स्वतःबाबत योग्य वाटेल तो निर्णय घेऊ शकते, असं कोर्टाने म्हटलंय. जातीचे निकष लावून कुणाच्या जोडीदार निवडण्याच्या हक्कावर बाधा आणली जात असेल तर ते अतिशय गैर आहे. हा भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांचा भंग आहे, असं कोर्टाने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

कुख्यात गुंड गजा मारणे विरोधात पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून ‘ही’ माहिती आली समोर

…अन् त्याने जखमी हाेऊनही स्वत:च्या रक्ताने लिहून ठेवला पुरावा

प्रेरणादायी! लेकीसाठी बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान केलं उभं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More