देहरादून | राजधानी दिल्लीतून चालविण्यात येणाऱ्या एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड उत्तराखंड पोलिसांनी केला आहे. उत्तराखंडमधील देहरादून येथे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्लीवरुन या संपूर्ण रॅकेटची सूत्र हलविण्यात येत होती. पोलिसांनी या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला असला तरीही ते रॅकेट नेमकं कोण चालवत होतं याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
देहरादून पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीशिवायच तपास कार्य सुरु केलं आहे. बुधवारी रात्री उत्तराखंड पोलिसांच्या काही तुकड्या या दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये तपास करत आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या लोकांनी अतिशय धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. त्याच्याच आधारावर पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. देहरादून पोलिसांनी दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नजर ठेवली आहे, अशीही माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या मुलींना दलालांच्या माध्यमातून दिल्लीहून देहरादूनमधील हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये पोहचवलं जायचं. या तरुणींना एका रात्रीसाठी 10 हजार ते 20 हजार रुपये दिले जायचे.
तरुणींना विशेष मागणीनुसारच दिल्लीहून महागड्या कार आणि बसमधून देहरादूनला आणलं जायचं. एका रात्रीसाठी एवढी मोठी किंमत दिली जात असल्याने पोलिसांना शंका आहे की, या रॅकेटच्या मागे एखाद्या बड्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मी काहीच करत नव्हते, तोच माझ्यासोबत चाळे करत होता” – https://t.co/9r5zcLB84K #म
— थोडक्यात (@thodkyaat) September 19, 2019
पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी सरकारकडे व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा! – https://t.co/poSLuexWjW #म
— थोडक्यात (@thodkyaat) September 19, 2019
“शरद पवारांचे पाय मराठवाड्याला लागले अन् मराठवाड्यात धो-धो पाऊस बरसला” – https://t.co/oIGmEPGV50 @dhananjay_munde @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) September 19, 2019
Comments are closed.