बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भररस्त्यात तरुणीचा हायहोल्टेज ड्रामा! गाडी चालकाच्या कानाखाली लगावत…; पाहा व्हिडीओ

लखनऊ | सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हि़डीओमध्ये एक तरुणी भररस्त्यात गाडी चालकासोबत वाद घालताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये ही तरुणी गाडी चालकाला मारहाण करत असल्याचं देखील दिसत आहे. या तरुणीविरोधात कृष्णानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ लखनऊ मधील अवध क्रॉसिंगजवळील सिग्नलचा आहे. क्रॉसिंगजवळ एक तरुणी रस्ता पार करत असताना अचानक एका कॅबच्या समोर आली. यावेळी कॅब चालकाने पटकन ब्रेक लावत गाडी थांबवली. यानंतर तरुणीने कॅब चालकाला गाडीतून खाली खेचत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

एक तरुण हा वाद मिटवण्यासाठी आला असता तरुणीने त्याच्या देखील कानाखाली लगावली. यावेळी अवध क्रॉसिंगजवळ बरीच गर्दी जमली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून या तरुणीवर टीका होऊ लागली आहे. तसेच या उद्धट तरुणीवर कारवाई केली जावी, अशी देखील मागणी होत आहे.

दरम्यान, कृष्णानगर पोलीस ठाण्यात या तरुणीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच हा व्हिडीओ समोर आल्यानंतर #ArrestLukcknowgirl अला हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.

थोडक्यात बातम्या –

विरोधी पक्षातील 100 खासदारांच्या बैठकीतील संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाले…

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”

मोठी बातमी! अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! संकेतस्थळावर लोड येऊ नये म्हणून 4 नव्या वेबसाईट जारी

“शिवसैनिकांनी योग्यच केलं, सत्तेत असलो तरी असले प्रकार सहन करणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More