फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका, स्टेशन परिसरात मनाईच!

मुंबई | रेल्वे स्थानकापासून 150 मीटरच्या परिसरात आणि फूटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही, असा उच्च न्यायालयानं निर्णय दिलाय.

न्यायालयाने या संदर्भातील फेरीवाल्यांच्या संघटनांची याचिका फेटाळून लावलीय. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ उतरलेले पक्ष, राजकीय नेते यांना या निर्णयामुळे जोरदार दणका बसलाय.

दरम्यान, एलफिस्टन्स रोड स्थानकाच्या दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावत, फेरीवाले हटाव मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते.