बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंना भोसरी जमिन प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा!

मुंबई | नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना तथाकथित भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती. सदरील जमिनीचे 37 लाख एवढे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले होते. सर्व प्रक्रियेनंतर ही जमिन भोसरी एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं पुढे आलं आहे. विशेष म्हणजे पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या सर्व व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे.

भोसरी येथील जमीन प्रकरणात खडसे यांना सक्तवसुली संचलनालय (ईडी)कडून नोटीस बजावण्यात आली होती. यासर्व प्रकरणाच्या विरोधात एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. आज उच्च न्यायालयात होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असल्याने खडसेंना तूर्तास तरी अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

30 डिसेंबरला सक्तवसुली संचालनालयाकडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते उशिराने चौकशीला उपस्थित राहिले. एकनाथ खडसे यांना सध्या 8 मार्चपर्यंत उच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक होणार नाही हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले…

“स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?”

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील फोटो!

कुलू मनालीला फिरायला जायचं का?; पूजा-गबरुशेठ मधील नवीन संभाषण समोर आल्यानं खळबळ

नव्या लुकसह ‘मारूती सुझुकी स्विफ्ट’ लवकरच बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More