आयुक्ताला जेलमध्ये टाकल्याशिवाय कायद्याची अंमलबाजवणी होणार नाही!

मुंबई | एखाद्या पालिका आयुक्ताला जेलमध्ये टाकल्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी होणार नाही, असं म्हणत मुंबई हायकोर्टानं पालिका आयुक्तांना चांगलचं फटकारलं. सण, उत्सवातील बेकायदेशीर मंडपाच्या याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टानं सुनावलं.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवी मुंबईत 62 बेकायदेशीर मंडप बांधण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई आणि केडीएमएसी आयुक्तांना कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली.

ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी बेकायदेशीर मंडपासंबंधी जनहित याचिका केली होती. त्यावर हायकोर्टानं पालिका आयुक्तांना फटकारलं.