बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचं काय?; उदय सामंत म्हणाले…

मुंबई | एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका असल्या तरी त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापू्र्वीच घेतला आहे. त्या निर्णयानंतर एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे किंवा काही जण ते जाणीवपूर्वक निर्माण करत असतील, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

ज्या पद्धतीनं इतर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे. तसाच योग्य निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

कोणीही मनात शंका ठेवू नये, तसंच कोणत्याही संभ्रमावस्थेला आणि गैरसमजाला बळी पडू नका. यासदर्भातील चर्चा युद्धपातळीवर सुरू आहे, असंही सामंत यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

महत्वाच्या बातम्या-

‘…तर तोंड बंद ठेवा’; पोलीस अधिकाऱ्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला

निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज- उद्धव ठाकरे

“जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More