पुणे | महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी उदय सामंत यांना देण्यात आली आहे. मात्र, उदय सामंत यांनी बोगस विद्यापीठातून पदवी घेतली असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरदास यांनी केला आहे.
राज्याचे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यानंतर आता उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात पदवी आणि विद्यापीठाचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ज्या विद्यापीठातून बीई पदवी घेतली होती. त्याच विद्यापीठाचे सामंत विद्यार्थी आहेत.
उदय सामंत यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरींगची पदविका घेतली आहे.ज्ञानेश्वर विद्यापीठाचा 2010 साली गाशा गुंडाळण्यात आला आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी होते.
दरम्यान, राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचीच पदवी खोटी असल्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिग बातम्या-
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल
“गुढीपाडव्याला महाराष्ट्रात नवं सरकार येईल”
महत्वाच्या बातम्या-
कुणीही स्वप्न बघू नका, हे सरकार पाच वर्षे चालणार- वळसे पाटील – https://t.co/zIdYl1CccW @Dwalsepatil @NCPspeaks @BJP4Maharashtra @INCMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
हृदयद्रावक! आॅस्ट्रेलियाच्या भीषण आगीत सुमारे 48 कोटी प्राणी जळाले- https://t.co/rCIODR05vR #AustraliaisBurning
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
राजू शेट्टींनी सरकारविरोधात दंड थोपटले; संपूर्ण कर्जमाफीसाठी बुधवारी भारत बंद!- https://t.co/2Jhak8vqSu @rajushetti @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
Comments are closed.