बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पक्ष या देशात ठेवायचा की नाही…”

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना सदाशिवनगर बंगळुरु येथे घडली होती. त्या घटनेनंतर बंगळुरूमध्ये तणावाचं वातावरण होतं. या घटनेचे देशभरातून निषेध करण्यात येत होता. त्यावरून कानडी विरूद्ध मराठी असा वाद पेटलेला दिसत आहे. त्यावर आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ही शुल्क गोष्ट असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे आता यांना कर्नाटकचे आणि महाराष्ट्राचे मतदार उत्तर देतील, असं उदय सामंत म्हणाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जर कोणता पक्ष पाठिशी घालत असेल तर तो पक्ष या देशात ठेवायचा की नाही हे मतदारच ठरवतील, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

झालेला हा प्रकार निंदनीय आहे. यापूर्वी देखील कर्नाटकात असे प्रकार घडलेले आहेत. मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना मी आवाहन केलं आहे की, त्यांनी कर्नाटक सरकारला सांगून जे कोणी समाजकंटक आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याने राष्ट्रवादीने देखील ठिकठिकाणी निदर्शने केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. तसेच बोम्मई यांच्या प्रतिमेला चप्पलांनी मारलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पालक म्हणून आम्ही आमच्या मुलीला…’; अनुष्का शर्माची पोस्ट व्हायरल

“मी नुसत्या बढाया मारत नाही, शिवसेनेचा धुव्वा उडवणारच”

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी मागितली माफी, म्हणाले…

“मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे ठरलं होतं, पण ऐनवेळी…”

“हा छत्रपतींचा महाराष्ट्र, अंगाशी खेटू नका नाहीतर गाठ आमच्याशी आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More