बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांच्या ‘या’ नव्या फतव्यामुळे अफगाणिस्तानमधील तरूण मोठ्या संकटात!

काबूल | अमेरिकन सैन्यांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेताच तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली. त्यानंतर अफगाण नागरिकांवर तालिबान्यांनी अनेक निर्बंध घातले. अशातच आता तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील 20 वर्षापासून ते आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या पदव्याबाबत नवा फतवा काढला आहे. त्यामुळे या फतव्यामुळे अनेक तरूणांच्या पदव्या आता संकटात सापडल्या आहेत.

खरं शिक्षण हे केवळ मदरशांमध्ये देण्यात येत असून अमेरिकेच्या प्रभावाखाली आखलेल्या शिक्षण पद्धतीतील पदव्या यापुढे अफगाणिस्तानमध्ये गृहित धरल्या जाणार नाहीत, असं अफगाणिस्तानचे नवे उच्च शिक्षणमंत्री अब्दुल बकी हक्कानी यांनी सांगितलं आहे.

तालिबाननं केलेल्या घोषणेनुसार 2000 ते 2020 मध्ये देण्यात आलेल्या सर्व पदव्या अवैध आहेत. त्यामुळे या पदव्या ज्या तरूणांना मिळाल्या आहेत. त्यांना या पदवीच्या आधारे कोणतीही नोकरी मिळणार नाही. काबूल विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांसमोर तालिबान्यांनी हा मुद्धा मांडला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान नागरिकांवर नवनवीन नियम जारी करत आहेत. अमेरिकेने आखलेल्या शैक्षणिक धोरणाचा अफगाणिस्तानच्या विकासात काहीही फायदा होऊ शकत नाही. पाश्चिमात्य विचार आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे धडे देणारे शिक्षण अफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी योग्य नसल्याचा दावाही तालिबान्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुंबईत अंमली पदार्थाची सर्रास तस्करी होत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का?”

‘माझा मुलगा तिथं असल्याचा पुरावा मिळाला तर मी…’; अजय मिश्रा यांचं खुलं आव्हान!

बाबो! ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात करणाऱ्या यामी गौतमला आहे ‘हा’ गंभीर त्वचा रोग!

‘तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर असतो…’; आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया!

मोठी बातमी! 36 तासांच्या नजरकैदेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More