बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे वाचा एकाच ठिकाणी!

नाशिक | शिवसेना नेते संजय राठोड यांच्या विरोधात भाजपच्या चित्रा वाघ राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत. नाशिक येथे भाजप महिला आघाडीतर्फे संजय राठो़ड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी आंदोलन केलं. त्यानंतर चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर चित्रा वाघ आणखी आक्रमक झाल्या आणि त्यांनी सरळ पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर आक्रमकपणे टीका केली आहे.

– आज मला शरद पवारांची आठवण होते. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारांनी मला बोलावून घेतलं. तक्रारीची कॉपी वाचली आणि तुझा नवरा कशातच नसल्याचं पवारांनी सांगितलं. त्यानंतर देखील माझ्या पतीविरोधात केस उभी राहिली, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

– पुरोगामी महाराष्ट्र सगळं बघतोय मुख्यमंत्री साहेब आम्ही आवाज उठवला तर आमच्यावरच केसेस? पण केसेस दाखल जरी झाल्या तरी आम्ही प्रश्न विचारतच राहू, ही चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेन, अशा इशारा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

-एवढे पुरावे असतानाही एफआयआर का दाखल केला जात नाही? ही कसली शिवशाही ही तर मोगलाई आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते, तर त्यांनी राठोड यांना फाडून खाल्लं असतं, असंही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्यात.

– साहेब हे सर्व एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना?, असा खोचक प्रश्न चित्रा वाघ यांनी केला आहे. साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का? की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही. आपण शिवरायांचा महाराष्ट्र म्हणता ना, तर मग तो कृतीतून दाखवायची वेळ आली आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

– संजय राठोडांचा राजीनामा घेईपर्यंआम्हीत  मागे हटणार नाही, आम्ही तोपर्यत लढत राहणार आणि बोलत राहणार. मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही.

– अरुण राठोडने सकाळी 8 वाजून 40 मिनिटाने कंट्रोल रुमवरील महिलेने दिलेल्या नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर अरुण राठोडला दोन मिनिटं थांबायला सांगितलं, आणि कॉन्फरन्स कॉलवर अजून एका व्यक्तीला घेऊन पुन्हा एकदा कबुली द्यायला सांगितली. त्यानंतर राठोडने तुम्ही कोण? असं विचारलं तर असं नाव सांगता येणार नाही, असं त्याला सांगितलं गेलं, असंही चित्रा वाघ म्हणाल्यात.

– पूजा चव्हाणच्या मोबाईलवर राठोड यांच्या नावाने 45 मिस कॉल्स आले होते. हा राठोड कोण? पोलिसांनी ते मिस्ड कॉल पाहिले की नाही? मिस्ड कॉल असणाऱ्या व्यक्तीचा शोध अजूनपर्यंत का घेतला गेला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित  केले आहेत.

यानंतर अनेक भाजप नेत्यांनी पुढे येऊन चित्रा वाघ यांचं समर्थन केलं आहे. त्याच बरोबर ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्याच बरोबर संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?”

“खुर्ची इतकी वाईट आहे का, की ज्या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

“बेजबाबदार वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का?”

“उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं”

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More