बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब बंदी योग्य’; उच्च न्यायालयचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हिजाब घालण्यासाठी परवानगी देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज 15 मार्चला निकाल जाहीर केला. हिजाब हा इस्लामच्या अनिवार्य असलेल्या परंपरांचा भाग नाही, असं स्पष्ट करत कर्नाटक उच्च न्यायालयानं शैक्षणिक संस्थामधील हिजाब बंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

शाळा-महाविद्यालयात घालण्यात आलेल्या हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. उड्डपी येथील मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर मुलींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शाळेत हिजाब घालण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. शाळेचा गणवेश परिधान करण्यास विद्यार्थी नकार देऊ शकत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, चार प्रश्नांच्या आधारावर न्यायालयाने निकाल दिला आहे. पहिला प्रश्न – हिजाब घालणे इस्लामच्या अनिवार्य प्रथांचा भाग आहे का? दुसरा प्रश्न – मूलभूत हक्क लक्षात घेता शालेय गणवेश घालण्याचा नियम कायदेशीर आहे का? तिसरा प्रश्न – 5फेब्रुवारी रोजीचा राज्य सरकारचा निर्णय कोणताही विचार न करता आणि मनमानीने घेतलेला आहे का? चौथा प्रश्न – महाविद्यालय प्रशासनाविरूध्द शिस्तभंगात्मक चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात का?

थोडक्यात बातम्या – 

मुळशी पॅटर्नमधील ‘ती’ चहावाली अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीण, वाचा काय करतेय काम

IPL 2022: BCCI नं आयपीएल नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

इंधन दरात काय बदल झाला?, वाचा आजचे ताजे दर

वारंवार तहान लागणंही शरिरासाठी ठरु शकतं घातक, वाचा काय आहे कारण

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More