मुंबई | कर्नाटकमधील एका महाविद्यालयानं मुस्लीम मुलींनी हिजाब घातल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश नाकारला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात वादंग निर्माण झाला. याचे पडसादही देशभरात पहायला मिळाले. अशातच आता या वादात दंगल फेम झायरा वसीमनं उडी घेतल्याचं पहायला मिळालं.
झायरा वसीमनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित हिजाब वादावर आपली प्रतिक्रिया दिल्याचं पहायला मिळालं. झायरानं पोस्टमध्ये म्हटलं की, हिजाब हा पर्याय नसून इस्लाममध्ये ईश्वराने दिलेली जबाबदारी आहे. जेव्हा एखादी महिला हिजाब परिधान करते, तेव्हा ती देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करत असते. जिच्यावर तिचे प्रेम असते आणि तिने स्वतःला त्याच्यासाठी समर्पित केलेले असते.
मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणे, त्यांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडायला लावणे आणि एक सोडायला लावणे हे अन्यायकारक आहे, असंही झायरानं म्हटलं आहे.
दरम्यान, पुढे झायरानं म्हटलं की, सक्षमीकरणाच्या नावाखाली हे सर्व करणे वाईट आहे, कारण यात सक्षमीकरणाची कोणतीही चर्चा नाही. हा एक मुखवटा आहे.
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) February 19, 2022
थोडक्यात बातम्या –
“जगात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या कमी नाही”
कोरोनाचा Deltacron Varient वाढवतोय सर्वांची चिंता, अत्यंत महत्वाची माहिती समोर
अन् सकाळी सकाळी संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले…
गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका, म्हणाले ‘ काहींना आजही…’
“किरीट सोमय्या कोण मला माहिती नाही, असे चु… देशात भरपूर आहेत”
Comments are closed.