दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

नवी दिल्ली | अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज 2 रुपयांची महागला आहे. केंद्र सरकारने एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने वाढीव दराचा भुर्दंड सामान्य लोकांना सोसावा लागणार आहे.

या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी मुंबईमधील ग्राहकांना 505.05 रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या जूनपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये दर महिन्याला सातत्याने वाढ होत आहे. जीएसटी अाणि एकूण किमतीत 16.21 रुपयांची वाढ ही यामागील कारणे असल्याचं सांगितलं जात आहे.

वितरकांचे कमिशन 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 तर 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये होते. ते आता अनुक्रमे 50.58 आणि 26.29 असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

-पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर

-आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या