झोपेतून उशिरा उठली म्हणून पत्नीला दिला तलाक!

लखनऊ | पत्नी सकाळी उशिरा उठल्याने संतप्त झालेल्या पतीने तिला थेट तलाक दिला. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

गुल अफशा असं याप्रकरणातील पीडित पत्नीचं नाव आहे. आपण उशिरा उठल्यामुळे आपल्या पतीने आपल्याला तलाक दिल्याचा आणि बेदम मारहाण केल्याचा तिचा आरोप आहे. 

दरम्यान, तीन तलाकची प्रथा बंद करण्यासाठी कठोर कायदा आणण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केलीय. मात्र तरी देखील अशा घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.