बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्वदच्या दशकातील मुलांनो… तुमचा आवडता रोला कोला परत येतोय!

नवी दिल्ली- नव्वदच्या दशकात रोला कोला कँडीची मुलांमध्ये चांगलीच क्रेझ होती. मात्र, रोला कोलाने भारतातील उत्पादन बंद केले होते. कंपनी आता पुन्हा एकदा आपले भारतातील उत्पादन सुरु करणार असल्याने रोला कोलाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

नव्वदच्या दशकात काॅटन कँडी आणि आईस लाॅली हे चाॅकलेट प्रकार चांगलेच प्रसिद्ध होते. त्याबरोबरच रोला कोला कँडीची मुलांमध्ये चांगलीच क्रेझ होती. कारण त्यात कोला आणि कँडीचे योग्य मिश्रण होते आणि ते मुलांच्या आवडीचे बनले होते.

अनेक दिवसांपासून रोला कोलाच्या चाहत्यांना या चॉकलेटचे उत्पादन पुन्हा भारतात सुरु व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळे अखेर पारले कंपनीने चाहत्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत रोला कोला कँडीचे उत्पादन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पारले कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे. चाहत्यांनी ट्विटवरुन पारले कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More