भारताची ‘सुवर्णकन्या’ हिमा दास; अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत रचला इतिहास

झेक प्रजासत्ताक | भारताची सुपरस्टार धावपटू हिमा दासने मागील 11 दिवसात तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे.  झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे.

जागतिक स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. 5 जुलै आणि 8 जुलै रोजी हिमा दासने 200 मिटर शर्यतीत सुवर्णपदकं जिंकली होते. आता पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकत हिमा दासने इतिहास रचला आहे.

हिमा दासने 200 मिटर शर्यतीत 23.46 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पाटकावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे.

दरम्यान,  गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेली हिमा दासने स्पर्धेत पुनरागमन करत 11 दिवसात भारताला तिन सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटची मुंबई पोलिसांनी घेतली दखल

-…म्हणून युवराजला संघाबाहेर काढलं; युवराज सिंहच्या वडिलांचा गंभीर आरोप

-मामा-भाचे काँग्रेसला तारणार का???

-शिवसेनेच्या बॅनरवर आता फक्त ठाकरे…

-बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेची पुन्हा एंट्री, पण बिग बॉसने घातली ‘ही’ अट

Loading...