Loading...

शाब्बास हिमा!!! 15 दिवसात देशासाठी खेचून आणलं चौथं सुवर्णपदक

नवी दिल्ली | भारतीय धावपटू हिमा दास हीने चेक रिपब्लिकमध्ये सुरू असलेल्या टॅबोर अ‌ॅथलॅटिक्स 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. 200 मीटरची शर्यत तीने केवळ 23.25 सेकंदातच पुर्ण केली आहे.

गेल्या 15 दिवसात तिने हे चौथं सुवर्णपदक आपल्या नावी केलं आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading...

टॅबोर अ‌ॅथलॅटिक्स या शर्यतीत हिमाची सहकारी व्हीके विस्मया दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तीने ही शर्यत 23.43 सेकंदात पुर्ण केली आहे.

पोलंडमध्ये पोजनान अ‌ॅथलॅटिक्स ग्रँड पिक्स स्पर्धेत हिमाने या पंधरा दिवसातलं पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर पोलंडच्याच कुटनो अ‌ॅथलॅटिक स्पर्धेत तिने दुसरं सुवर्णपदक जिंकलं. चेक रिपब्लिकमध्ये हुई क्लांदो मेमोरियल अ‌ॅथलॅटिक स्पर्धेतही तीने आणखी एक सुवर्णपदक भारताच्या खात्यात टाकलं.

 

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-अभिजीत बिचुकलेंच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

Loading...

-गुजरात भाजपच्या जाळ्यात अडकला मोठा मासा!

-नेत्यांचं पक्षांतर थांबता थांबेना! राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजप प्रवेश फिक्स

-मायावतींच्या भावाला आयकर विभागाचा दणका; केली मोठी कारवाई

-“विधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार म्हणजे आणणार”

Loading...