हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर

Himachal Election Result | आज 4 जुनचा दिवस राजकीय नेत्यांचं तसंच देशाचं भविष्य ठरवणारा दिवस आहे.आज देशातील 542 जागांचे निकाल जाहीर होणार आहे. देशात 1,224 मतमोजणी केंद्रांत मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

कंगना रनौत मंडीमधील उमेदवार

तर, सकाळी 11 वाजल्यापासून निकालाचा स्पष्ट कल येण्यास सुरुवात होईल. आता हाती आलेल्या कलानुसार हिमाचल प्रदेशमधून अभिनेत्री कंगना रनौत पिछाडीवर असल्याचं दिसतंय.कंगना विक्रमादित्य सिंह यांच्यापासून पिछाडीवर असल्याचे कल समोर येत आहेत.

हिमाचल प्रदेशातील चार जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच सहा विधानसभा जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचलमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये (Himachal Election Result)थेट लढत होत आहे. त्यात अभिनेत्री कंगना रनौतला मंडी येथून तिकीट देण्यात आलंय.

कंगना vs विक्रमादित्य सिंह

हिमाचलची मंडी लोकसभा सीट सध्या हॉट सीट बनली आहे. येथे भाजपकडून कंगना रणौत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यात थेट लढत आहे. एक्झिट पोलच्या निकालात (Himachal Election Result) मंडीमधून कंगना राणौतचे नाव आघाडीवर होते. मात्र, आता आलेल्या कलानुसार कंगना पिछाडीवर असल्याचं कळतंय.

News Title- Himachal Election Result 2024 

महत्वाच्या बातम्या-

भाजपने गुलाल उधळला; या उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

मोठी बातमी! निकाल लागण्यापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?

सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!

लोकसभेच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का!

निकालाआधीच झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर