मोठी बातमी! पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कंगनाला मोठं यश; उधळला विजयी गुलाल

Himachal Election Result | हिमाचल प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हिमाचलमधील मंडी येथून बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत हीने विजयी गुलाल उधळला आहे. कंगनाने 18,152 मतांनी विजयावर मोहोर लावली आहे.

कंगनाविरुद्ध येथे कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह मैदानात होते. पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कंगनाने पहिला विजय नोंदवला आहे. हिमाचल प्रदेशातील चार जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच सहा विधानसभा जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचलमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये (Himachal Election Result)थेट लढत होत आहे. त्यात अभिनेत्री कंगना रनौतला मंडी येथून तिकीट देण्यात आलं.

कंगना रनौत विजयी

याच भागातून कंगना निवडून आली आहे. एक्झिट पोलच्या निकालातही (Himachal Election Result) मंडीमधून कंगना राणौतचे नाव आघाडीवर होते. आता निकाल देखील अभिनेत्रीच्या बाजूने लागला आहे. कंगना येथून विजयी झाली आहे.

कॉँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा पराभव

कॉँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कंगनाने मंडी येथे जोरदार प्रचार केला होता. त्याचा तिला फायदा झाला आहे. विजयी झाल्यानंतर कंगनाने पहिली प्रतिक्रिया देखील दिली. ‘मंडीच्या लोकांनी माझी निवड करत परिवार वादाला मागे टाकलं आहे.’, असं यावेळी कंगना म्हणाली.

News Title-  Himachal Election Result Kangana Ranaut wins

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र लोकसभा निकाल पाहा सर्वात आधी अवघ्या एका क्लिकवर!

मोदी महाराष्ट्रात येऊन त्यांना म्हणाले लहान भाऊ!, आता तेच 18 हजारांनी मागे

धाराशिवमध्ये मशाल पेटणार?; ओमराजे निंबाळकरांची विजयाची औपचारीकता बाकी

महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं; ‘या’ नेत्याने मारली बाजी

काँग्रेस सत्तेत येणार?, भाजपविरोधात टाकला आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव