Top News

‘या’ राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये 30 जूनपर्यंत वाढवलं लॉकडाऊन

शिमला | हिमाचल प्रदेश सरकारने जिल्हा दंडाधिकारी कलम 144 अन्वये दोन जिल्ह्यांतील कर्फ्यू 30 जूनपर्यंत वाढवला आहे. सोलन आणि हमीरपूर जिल्ह्यातील डीसींनी कर्फ्यू वाढवत असल्याची घोषणा केली आहे.

उपायुक्त सोलन के. सी. चमन यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 144 (1) अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्ह्यात 24 मार्च रोजी जाहीर केलेल्या कर्फ्यूचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे.

सोलन जिल्ह्यात कर्फ्यूमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सूट मिळणार आहे. संध्याकाळी 07 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजेपर्यंत आवश्यक सेवावगळता इतर व्यक्तींना बाहेर येण्यास बंदी राहणार आहे.

दरम्यान, हमीरपूर जिल्ह्यात न्यायदंडाधिकारी हरिकेश मीणा यांनी 30 जूनपर्यंत कर्फ्यू वाढविला आहे. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुणेकरांनो सावधान… पुण्यात आज सापडले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

महत्वाच्या बातम्या-

विमान प्रवाशांसाठी ‘अशा’ आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स!

महाराष्ट्र सरकारने राजकारण करणं बंद केलं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

“पियुष गोयल पदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या