..अन् अभिनेत्रीने थेट सलमान खानच्या कानाखाली लगावली; नेमकं असं काय घडलं होतं?

Salman Khan | बॉलिवुड अभिनेता सलमान खान याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यात त्याचा ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट देखील येतो. याच चित्रपटाच्या सेटवर एका अभिनेत्रीने सलमानच्या कानाखाली लगावली होती. याबाबत आता वर्षांनंतर मोठा खुलासा झाला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित सलमानसोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसली होती. नुकताच सलमान खानच्या एका को-स्टारने सेटवरील एक किस्सा सांगितला आहे. एका कारणामुळे या अभिनेत्रीने सलमानच्या कानाखाली मारली होती.

हिमानी शिवपुरी यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात रजिया उर्फ चाची जान बनल्या होत्या. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने कॅमेरामागील एक किस्सा सर्वांशी शेअर केला. हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

“पहिल्यांदा जेव्हा मी सलमान खानल भेटली तेव्हा आम्हाला डायरेक्टर सूरज बडजात्या एक सीन समजावून सांगत होते आणि त्यांनी ठीक आहे असं म्हटलं. सीन शूट सुरू असताना सलमान खानने मला ‘चाची जान’ असं म्हटलं आणि मला उचलून घेतलं.”, असं अभिनेत्री हिमानी शिवपुरी म्हणाल्या.

‘हम आपके है कौन’च्या सेटवर घडला होता हा प्रकार

पुढे त्यांनी सांगितलं की, “मी थिएटर बॅकग्राउंडमधून आली होती. त्यामुळे लगेच रिअॅक्ट केलं आणि सलमानला एक कानाखाली लगावली. हे सगळं बघून डायरेक्टर सूरज बडजात्या देखील हैराण झाले होते.” अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी अनेक वर्षांनंतर हा किस्सा सांगितला आहे. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान, ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याचबरोबर रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, आलोक नाथ, मोहनीश बहल असे कलाकार देखील होते.

News Title –  Himani Shivpuri big reveal about Salman Khan

महत्वाच्या बातम्या-

“रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात”; अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

“धनदांडग्याची मुले असो किंवा राजकारण्यांची..”; ‘हिट अँड रन’ प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास

“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले

पुण्यात झिका व्हायरसने घातलयं थैमान; आढळले ‘इतके’ रुग्ण