आलोकनाथ यांच्या अडचणीत भर; हिमानी शिवपुरींनी सांगितला ‘तो’ भयानक किस्सा

मुंबई | #MeToo मोहिेमेमुळं बॉलिवुडमधील संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर काही आरोप करण्यात आले आहेत. त्यात आता अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनीही त्यांच्यावर आरोप केले आहेत. 

एकदा चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान आलोकनाथ माझ्या खोलीत दारू पियुन आले त्यांना पाहून मी घाबरले होते. ते माझ्याशी गप्पा मारताना काहीही बरळत होते. मी त्यांना माझ्या खोलीतून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी जाण्यास नकार दिला, असं हिमानी शिवपुरी यांनी सांगितलं. 

त्यानंतर मी जोरजोरात आरडाओरडा केला. तेव्हा इतर लोक आले आणि त्यांना तिथून घेऊन गेले. हा अनुभव भयंकर होता, असं त्यांनी सांगितलं. 

आलोकनाथ सेटवर महिलांशी विनम्र वागायचे मात्र संध्याकाळी दारू पिल्यानंतर ते वेगळेच वागायचे. जणू ते दुहेरी आयुष्य जगता आहेत, असंही हिमानी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या लेखकांना फाडा- नितेश राणे

-आरएसएस पंतप्रधान मोदींना बळीचा बकरा बनवणार!

-मी शरद पवारांचा चक्रधारी; मलाच माढ्याचं तिकीट मिळायला हवं!

-नानांनी तनुश्रीला व्हॅनीटी व्हॅनमध्ये बोलवलं आणि…

-रूपाली चाकणकरांवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या