धुळे | भाजप खासदार हिना गावित यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 22 जणांना अटक केली होती.
जामीन मिळण्यासाठी आंदोलकांनी अर्ज केला होता. त्यामुळे सोमवारी यावर सुनावणी होणार आहे, तसंच हिना गावित आपली बाजू मांडणार आहेत.
दरम्यान, धुळे वकील संघाने मराठा आंदोलनास पाठिंबा दिला असून संशयित 22 मराठा आंदोलकांना न्याय मिळण्यासाठी कायदेशीर लढाई केली जाईल, असं संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप पाटील यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धुळ्यातील अटकेत असलेल्या मराठा मोर्चेकऱ्यांसाठी तब्बल 150 वकीलांची फौज!
-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!
सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी- अशोक चव्हाण
-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी
-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी