बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन…”

मुंबई | भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार डॉ हिना गावित (MP Hina Gavit) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदोर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला जनादेश धुडकावून फसवून सत्तेत आलेलं हे सरकार असल्याची टीका हिना गावित यांनी केली आहे. (Hina Gavit Criticises Thackeray Goverment)

ठाकरे सरकारने (Thackeray Goverment) कोरोनाकाळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत ढकललं. त्यामुळेच महाराष्ट्राची कोरोना विरोधातील लढ्यातील सर्वात अपयशी राज्य अशी नोंद झाली असल्याचा घणाघात हिना गावित यांनी केला आहे. कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याची स्पर्धा सुरू असल्याचा आरोपही हिना गावित यांनी केला आहे.

केंद्र सरकारने (Central Goverment) वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधात केविलवाणी झुंज सुरू राहिली असती, अशी खोचक टीकाही हिना गावित यांनी केली आहे. यावेळी बोलताना हिना गावित यांनी मुख्यमंत्र्यांवरही आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

कोरोना काळात मंत्रालयातून पळ काढून घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्रांनी (CM Uddhav Thackeray) महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून संकटाशी सामना कऱण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली. या अपयशात मी जबाबदार असं नागरिकांकडून वधवून घेताना स्वत:चे कुटुंब सांभाळत माझे कुटंब माझी जबाबदारी असा बेजबाबदारपणा दाखवला असल्याची घणाघाती टीकाही हिना गावित यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीबाबत ‘ही’ माहिती आली समोर, वाचा एका क्लिकवर

मुख्याध्यापकाचं निलंबन मागे घ्या; 521 विद्यार्थी आझाद मैदानावर काढणार मोर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More