चाहत्यांना धक्का! अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ कॅन्सर

Hina khan Cancer l ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री हिना खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिना खान ही ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. हिना कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. हिना खानने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी देतेय झुंज :

अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ती कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. हिनाने ही पोस्ट शेअर केली असून ती यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि खंबीरपणे उभी असल्याचे म्हटले आहे. हिना खानने ही पोस्ट शेअर करताच तिचे चाहते काळजीत पडले आहेत.

अभिनेत्रीच्या तंदुरुस्तीसाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावर अनेकदा आपल्या स्टायलिश फोटो आणि व्हिडिओंनी चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हिना खानबद्दलची ही बातमी हृदयद्रावक आहे. टीव्हीच्या दुनियेत हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोद्वारे खास ओळख निर्माण केली आहे. यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Hina khan Cancer l अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर चाहत्यांना दिली माहिती :

या आजाराविषयी माहिती देताना हिना खानने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, सर्वांना नमस्कार, जे लोक माझ्यावर प्रेम करतात आणि काळजी घेतात. त्यांच्यासाठी मी एक बातमी शेअर करणार आहे. मला स्टेज 3 चा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. हे माझ्या आयुष्यातील पुढचे आव्हान आहे.

मात्र मी ठीक आहे. मी मजबूत, दृढनिश्चयी आहे आणि या आजारावर मात करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझे उपचार सुरू झाले आहेत आणि यातून आणखी मजबूत होण्यासाठी मी जे काही आवश्यक आहे ते करण्यास तयार आहे.

News Title – Hina Khan Stage 3 Breast Cancer

महत्त्वाच्या बातम्या

अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

“अजित पवारांचे 22 आमदार संपर्कात”; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता?

बैल खरेदीच्या वादातून झाला गोळीबार, पुढे घडलं भयंकर?

बीड कथित ऑडिओ प्रकरणी ‘या’ दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल