Hina Khan | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेत अक्षराची भूमिका साकारलेली अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. ‘अक्षरा’ या भूमिकेमुळे हिना खान घराघरात पोहोचली होती. या मालिकेमधील गाणी तर अजूनही लग्नात वाजवली जातात. हिना खानचा चाहतावर्ग या मालिकेमुळे प्रचंड वाढला होता.
सध्या हिना तिच्या आजारामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 36 व्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समोर आलं आहे. ती स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. सध्या हिना या आजारावर उपचार घेत आहे.
हिना खान ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात
सोशल मीडियाच्या माध्यमातून हिनाने केमोथेरपीमुळे तिच्या शरीरावर झालेल्या खुणा दाखवल्या आहेत. हिना खानने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये विचारले, ‘तुन्हाला या फोटोत काय दिसतेय? माझ्या अंगावरचे चट्टे की डोळ्यात आशा? आशा माझ्या डोळ्यात आहे, माझ्या आत्म्याची सावली आहे. मी माझ्या बरे झालेल्या जखमा दाखवत आहे.’, हिनाच्या या पोस्टने चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
हिना (Hina Khan) लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या पोस्टवर मिका सिंगने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘तू सिंहिणी आहेस आणि इंशाअल्लाह सर्वकाही ठीक होईल. लवकर बरी हो, माझ्या प्रार्थना तुझ्या पाठीशी आहेत.’, असं मिका सिंह म्हणाला आहे.
View this post on Instagram
हिना खानची ‘ती’ पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का
यासोबतच जुही परमार, मोना सिंग, मसाबा गुप्ता, दलजीत कौर, मोनालिसा, अर्जुन बिजलानी, लता सबरवाल, आरती सिंग, पार्थ समथान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, हिनाने (Hina Khan) काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या आजाराविषयी माहिती दिली होती. नुकतीच तिची पहिली केमोथेरीपी झाली आहे. ज्यानंतर तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हिनाच्या या आजाराबाबत कळल्यानंतर चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
News Title – Hina Khan Share Her First Photo After Chemotherapy
महत्त्वाच्या बातम्या-
“सरकारला रोष परवडणार नाही, मराठ्यांना कमजोर समजू नका”; जरांगे पाटील यांचा इशारा
हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा जोर; पत्नीला सोडून पांड्या चक्क..
काळजी घ्या! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोनं फक्त..
सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार; बटाटा-कांदा-टोमॅटोचे भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले