बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिंदी चित्रपट अश्लिल, फाॅलो करणं बंद करा – इम्रान खान

इस्लामाबाद | पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान हे नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. यातच आता बाॅलिवूडच्या चित्रपटांची नक्कल करू नका, म्हणत इम्रान खान यांनी पाकिस्तानातील चित्रपट निर्मात्यांना सल्ला दिला आहे.

इम्रान खान यांनी इस्लामाबाद येथील एका शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना सांगितलं, पाकिस्तानच्या चित्रपटाने सुरुवातीला भारतीय सिनेमाची नक्कल केली. सुरुवातीला चुका केल्या कारण पाकिस्तानच्या चित्रपट उद्याेगावर बाॅलिवूडचा प्रभाव होता. त्यामुळे संस्कृतीची देखील नक्कल झाली. स्वीकारली गेली. परंतु, आता आपल्याला आपल्या मूळ आशयावर लक्ष दिले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गाेष्ट म्हणजे जगात अस्सलता विकली जाते.

मी नव्या फिल्ममेकर्सना एकच सांगू इच्छितो की, तुमचा ओरिजिनल कंटेन्टच बाजारात विकला जाईल. त्यामुळे तुम्ही त्यावर जास्त भर दिला पाहिजे. पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जगासमोर एक नवी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकते, असंही इम्रान यांनी म्हटलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला होता. त्यामुळे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागला होता.

थोडक्यात बातम्या – 

भारतात राष्ट्रपतींना खरंच शिक्षकांपेक्षाही कमी पगार मिळतोय?; हे वाचून कळेल वास्तव काय!

“…तर मी स्वत: अजितदादांविरोधात तक्रार करेल”

निशाने करण मेहराच्या परिवारावर केला गुन्हा दाखल, धक्कादायक कारण आलं समोर

“राज्य सरकार कोरोनाची दहशत पसरवत जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी लादत आहे”

‘विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केलं हा तसाच प्रकार’; नाथाभाऊंचं फडणवीसांवर टीकास्त्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More