बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नासाठी धर्मांतर करणारे हिंदू लोक हे…- मोहन भागवत

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हिंदू धर्मावर प्रखरतेने आपलं मत मांडताना दिसत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी हिंदू-मुस्लीम एकतेवर देखील भाष्य केलं होतं. त्यानंतर आता मोहन भागवत यांनी उत्तराखंडच्या देहराडून येथील एका कार्यक्रमात धर्मांतराच्या मुद्द्यावरून आपलं मत व्यक्त केलं आहे.

हिंदू कुटूंब आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी परंपरा आणि मुल्यांचं शिक्षण देत नाही. धर्मांतर कसं काय केलं जातं?, आपल्या देशात मुले आणि मुली धर्मात कसे काय जातात?, लग्नासाठी अन्य धर्मात धर्मांतर करणारे हिंदू लोकं मोठी चूक करत असल्याचं देखील भागवतांनी यावेळी सांगितलं आहे. तर, हा मुद्दा वेगळा आहे की आपण आपली मुले तयार करत नाही, असंही भागवत म्हणाले आहेत.

भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’ सारखा कायदा करण्यात आला. हिंदू समाज एकत्रित करणे हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्धिष्ट आहे. आपण कार्यक्रम करतो तेव्हा फक्त पुरूषच दिसतात. जर आपल्याला संपूर्ण समाजाला एकत्रित करायचं असेल तर, 50 टक्के महिलांनी सहभागी होण्याची गरज असल्याचं मोहन भागवतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिंदू कुटुंबांनी मातीशी नाळ घट्ट केली पाहिजे, सध्या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर सर्वकाही पहायला मिळतं. त्यामुळे आपल्या मुलांनी काय पहावं आणि काय पाहू नये, हे त्यांना शिवण्याची गरज आहे, असंही भागवत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

रकुल प्रीत सिंह करतीये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भन्नाट ऑफर! लस घेतली तर मिळणार ‘या’ गोष्टी मोफत

अजब! ‘पैसे नव्हते तर कुलूप कशाला लावलं’, चोरीनंतर चोराने लिहीलेल्या चिठ्ठीचीच सर्वत्र चर्चा

‘ही’ सरकारी कंपनी वाटणार मोफत सिमकार्ड; वाचा सविस्तर

“हे तर मुलांचं राज्य आहे, मुलींचा सन्मान यांची संस्कृती नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More