बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोमूत्र अन् शेणाचं सेवन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही”

मुंबई | कोरोना व्हायरसमुळे जगभरात आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गोमूत्राचं आणि शेणाचं सेवन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही, असा अजब दावा हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी केला आहे.

भारतासह अनेक देशांनी चीनमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना हलवण्याचं काम हाती घतलं आहे. अशातच हिंदू महासभेनं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी भलताच सल्ला दिला आहे.

गोमूत्र प्राशन केल्यानं आणि गाईचं शेण सेवन केल्यानं कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबू शकतो. कोणत्याही व्यक्तीनं ओम नम: शिवाय म्हणत गाईचं शेण शरीरावर लावल्यास तो आजारापासून वाचू शकतो, असं स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस’वर सध्या चीनमध्ये उपचार शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञ या व्हायरसचा अभ्यास करत आहेत. मात्र अजून तरी या व्हायरस प्रतिबंध करेल अशा प्रतिकारक औषधाला परवानगी देण्यात आलेली नाही, असं चीनच्या आरोग्य खात्यानं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, ‘ते’ वक्तव्य आक्षेपार्हच- चित्रा वाघ

मराठा तरुणांंचा ‘मातोश्री’बाहेर आत्मदहनाचा इशारा

महत्वाच्या बातम्या- 

पदवीधारकांसाठी 5 हजार, तर पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बरोजगारी भत्ता; काँग्रेसची घोषणा

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला खर्च होतात तब्बल इतके कोटी!

मोदी सरकारने मांडलेल्या बजेटवर पी. चिदंबरम यांची सडकून टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More