नवी दिल्ली | जामिया मिलिया विद्यापीठ परिसरात तैनात असलेल्या पोलिसांसमोरच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या तरूणाचा हिंदू महासभेकडून सत्कार केला जाणार असल्याची माहिती आहे.
हा तरूण नथुराम गोडसेप्रमाणे खरा राष्ट्रभक्त आहे. या मुलाचा आम्हाला अभिमान आहे, असंही हिंदू महासभेने म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त टाईम्स नाऊ या वेबसाईटने दिलं आहे.
देशद्रोही विचारसरणीचा व्यक्तींना धडा शिकवण्याचा प्रयत्न या तरूणाने केला आहे. खून आणि देशाच्या भल्यासाठी केलेल्या कृत्यामध्ये फरक असतो, असं हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरूणाचा सत्कार करण्याबरोबरच त्या या प्रकरणात लागणारा सर्व कायदेशीर खर्च हिंदू महासभा करणार असल्याचं पांडे यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“राजेंद्र आज असा नटलाय, लग्नात सुद्धा इतका नटला नव्हता”
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही अॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात…
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- देवेंद्र फडणवीस
100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केला होता ‘मूकनायक’!
Comments are closed.