मुंबई | संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनादरम्यान स्फोट घडवण्याचा कट होता, अशी प्राथमिक माहिती चौकशीतून समोर येत आहे. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि सरकारला इशारा देण्यासाठी हे स्फोट घडवले जाणार होते. ‘इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलंय.
गेल्या आठवड्यात एटीएसने नालासोपारा आणि राज्याच्या इतर भागातून 3 संशयित अतिरेक्यांना अटक केली. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर अशी त्यांची नावं आहे.
चौकशी दरम्यान एका संशयिताने पोलिसांना सांगितले, की मराठा आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हे स्फोट घडवले जाणार होते. स्फोटांची तीव्रता कमी ठेवण्यात येणार होती. पोलीस या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे याचा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती
-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा
-राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे- राष्ट्रपती
-अॅट्रॉसिटीच्या खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा!
-हिना गावित हल्ला प्रकरण; 18 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर
Comments are closed.