बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हिन्दुस्तानी भाऊ’ला पोलिसांनी घेतलं ताब्यात, जाणून घ्या कारण; पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘बिग बॉस’ फेम विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’  याला मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमधून त्याला ताब्यात घेण्यात आल आहे. याबाबत ‘पापाराजी विराल भयानी’ यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर माहिती दिली आहे. नक्की कोणत्या कारणामुळे ‘हिन्दुस्तानी भाऊ’ला अटक झाली?

हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होता. त्याने  इयत्ता 12वीच्या मुलांची परीक्षा रद्द करण्यासाठी आणि सरकारने मुलांची शालेय फी माफ करावी, या मागण्यांसाठी तो आंदोलन करत असल्याची माहिती समजत आहे. मात्र आपात्कालीन कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर बंदी आहे. या प्रतिबंधाचे हिंदुस्थानी भाऊने उल्लंघन केलं. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हिंदुस्थानी भाऊने रुग्णवाहिकेने प्रवास केला असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचा गैरवापर केला. हे आंदोलन म्हणजे फक्त प्रसिद्धी स्टंट असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हिंदुस्थानी भाऊ पहिल्यापासूनच आपल्या व्हिडींओंमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देश आणि जगाच्या वेगवेगळ्या घटनांबद्दल व्हिडीओ शेअर करतो. त्याचे सोशल मीडियावर मोेठा चाहता वर्ग आहे.

दरम्यान, विकास पाठक हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध होता. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतात. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. मात्र आता इंन्स्टाग्राम आणि फेसबुकचं खातं निलंबित करण्यात आलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या- 

जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ आली- राधाकृष्ण विखे पाटील

प्रेयसीचा गळा चिरुन खून, हळदीला बसलेल्या तरुणाला अटक, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

आनंदाची बातमी! कोरोनावर आणखी एका औषधाला मंजुरी, ऑक्सिजनची गरज होणार कमी

‘स्वामी…स्वामी..स्वामी…’म्हणत अंकिता लोखंडेने घेतली कोरोनाची लस, व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतात लसीचा साठा कमी असताना इतर देशांना पुरवठा कशासाठी?, परराष्ट्र मंत्री म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More